"काळ्या माणसाचा काळा प्रश्न"
कोळसा काळा खाण काळी,
कलमाडीचा खेळ काळा,
राजाची केस काळी ,
कनीमोळीची नियत काळी .
उत्तरेचा हत्ती काळा दक्षिणेची लुंगी काळी ,
हातावरील तीळ काळा कमळावरचा मळ काळा ,
इंजिन काळे गेला बाजार,
गजर देणारे घड्याळ काळे.
विठ्ठल काळा कृष्ण काळा,
मशिदीचा रंग काळा,
(एकूण काय)
देव काळा देवावरचा चेव काळा .
देव काळा देवावरचा चेव काळा .
Black (!)berryचा तोरा काळा ,
Facebookचा (खरा) चेहरा काळा,
Twitterची चिमणी काळी,
IT industry ची सूज न्यारी.
तू काळा मी काळा,
सूर्याचाही रंग काळा,
आसामचा चहा काळा,
दक्षिणेची कॉफी काळी.
साखरेचा धूर काळा,
गंगेचे तीर्थ काळे,
काल काळा आज काळा,
उदया काळा परवासुद्धा दिसतो काळा.
रंगांच्या या सावळ्या गोंधळात एक प्रश्न मी विसरतोय;
६५ वर्षांपासून दर १५ ऑगस्टला ,
लाल किल्ल्यावरून रडणाऱ्या ,
हातात तिरंगा धरून उभ्या असणाऱ्या तिचे
खरेच की काय प्राक्तन काळे ?
__सारंग सुधीर देसाई
माझ्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांना उत्तर मिळेल अशी माझी आपेक्षा अजिबात नाही पण तुमच्या प्रतिक्रिया मात्र अवश्य post करा.
माझ्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांना उत्तर मिळेल अशी माझी आपेक्षा अजिबात नाही पण तुमच्या प्रतिक्रिया मात्र अवश्य post करा.